Thursday, September 18, 2025

विद्येची दाता

12/09/2025

📖  विद्येची दाता  📚

करती आव्हान,ज्ञान द्यावे बाळा
सुरू केली शाळा,स्रीयांसाठी 

धर्माचे बंधन, तोडून शिकली
शिकवाया गेली,शाळेमधी 

रस्त्याची मर्कटे,करी शेण मारा
चिखलाने सारा,अंग भिजे 

धन्य ती माऊली,शिकवाया जाई
संगे साडी नेई,नेसावया 

मानवाचे जीने,देण्या सर्वां सुख
पचवली दुःख,माय सावी 

पहिली शिक्षिका,विद्येची ती दाता 
खरी शोभे माता, क्रांतीज्योती.

    अशोक मांदाडे, गडचिरोली.

Tuesday, September 16, 2025

उत्सवप्रिय समाजाची अधोगती

🌷उत्सव प्रिय समाजाची अधोगती 🌷

              07/09/2025

    समाज म्हटले की,समुह आलाच.हा समुह होण्यासाठी किंवा समाज समुहात एकत्र येण्याची अनेक कारणे आहेत.उदा.लग्न,नामकरण,अलिकडे जोर धरणारी पद्धत म्हणजे वाढदिवस साजरा करणे.या आनंदा बरोबरच समाजातील एकाद्याच्या मृत्यु सारख्या दुःखद प्रसंगी समाज एकत्र येतो.ही फार महत्वाची आवश्यक बाब आहे.सण उत्सव प्रसंगी एकत्र येतो.काही समाजाच्या उत्सव प्रसंगी संस्कृतीचे दर्श़नही होते.आपली संस्कृती जपली पाहिजे,यासाठी पारंपारिक पद्धतीने चालत आलेले उत्सव उपयोगीच ठरतात.पण यात आता काही नवे उत्सव घुसलेले आहेत.किंवा त्यांना पूर्वीचे जुने जरी म्हणाले तरी या उत्सवात ज्या काही बाबींची भर पडलेली आहे ,ते सर्व नवीनच आहेत.उदा.गणपती ,शारदा वा दुर्गा उत्सव,यासाठी विसर्जनाला डिजे लागतोच लागतो.गणपतीने हट्ट केला होता का ? मला डीजे हवा म्हणून.मग गणपतीच्या नावाने चंदा गोळा करायचा, विसर्जनाला डिजे लावायचा आणि मद्य पिऊन झिंग झिंग झिंगाट..... गाण्यावर नाचायचे.दुर्गा विसर्जनाला तुझा झगा ग वाऱ्यावर उडते......या गाण्यावर ताल धरायचा.ही अंधानुकरण करणारी पद्धत आत रूढ होत आहे.याठिकाणी श्रद्धा, भक्ती ,भाव याचा लवलेशही नसलेला हा उत्सव सध्यास्थितीत फार जोर धरलेला आहे.त्यांची श्रद्धा,त्यांना मिळालेले संविधानिक स्वातंत्र्य,हक्क आहेत.त्यानुसार आपल्या घरी करणाऱ्यांना आपण बोलू शकत नाही.
        आताच म्हटल्याप्रमाणे संस्कृती जपण्यासाठी उत्सवाचा उपयोग होतो ,पण हे उत्सव अपवाद आहेत.मुळात ते आपल्या संस्कृतीतून आलेले नाहीत.ते कसे नाही,याचे उदाहरण देताना आदिवासींच्या संस्कृती कडे पाहूया.आदीवासी अजूनही आपली संस्कृती जपून आहेत.त्यांची पारंपारीक वाद्ये व नृत्य टिकून आहेत.याला आता मात्र जपणे ,फार जरूरीचे झालेले आहे.कारण पूर्णपणे आदिवासी असलेल्या गावातही गणपतीने प्रवेश केलेला आहे.दुर्गा मांडून आदिवासी युवा युवतींचे गुजराती गरब्याच्या तालावर पाय फिरकायला लागलेले दिसतात.भीती आहे, पारंपारिक रेला पुढच्या पिढित टिकेल का?आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करता येईल का ? अलिकडे काही भागातील आदिवासी बांधव जागृतीच्या टप्प्यावर आहेत.आदिवसींच्या गुंडाधूर,तंट्या भिल्ल,वीर उमाजी नाईक,बिरसा मुंडा,वीर बाबूराव शेडमाके यांसारख्या शूरवीरांची,शहिदांची ओळख त्यांना होऊ लागलेली आहे.त्यांच्या पुढारलेल्या मंडळींनी,आता आपली खरी मूळ संस्कृती कोणती याची ओळख करून द्यावी.ही त्यांची, तुमची ,आमची जबाबदारी आहे.
     माझ्या ओबीसीतील समस्या फार मोठी आहे.शिकले सवरलेली मुले, आपल्या स्वःताच्या करीयर कडे लक्ष न देता गणपती उत्सवात, दहा पंधरा दिवस घालवण्यात स्वतःला धन्य माणतात.देवाजवळ काय मागत असतील,ते त्यांचे त्यांना माहित.
     आताच एका प्रशिक्षणासाठी,जे की त्यांच्याच हिताचे होते.मी जाण्यासाठी आपल्या मुलांना विचारलो.पण ते गणपती उत्सवात असल्यामुळे जाऊ शकणार नाही म्हणून मला नकार दिला.काय म्हणावे.भविष्य कसे असेल आपले.
   आता मराठ्यांचे मनोज जरांगेच्या नेतृत्वात मुंबईत केवढे मोठे आंदोलन,काहीतरी पदरात घेतल्याशिवाय त्यांनी मुंबई सोडली नाही.आमचा ओबीसी बांधव किमान आहे ते तरी टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊ शकेल का? जे मागासवर्गात नाहीत त्यांची मागणी आहे, मागासवर्गीय ओबीसी करा.आणि जे मागासवर्गीय ओबीसी आहेत त्यातील बहुतांश जणांना मागासवर्गीय असल्याचे ठावूक नाही,वाटतच नाही.कुठेतरी मी वरच्याच जातीतला आहे असे त्याला वाटते.जातीच्या उतरंडीत फसलेल्या  ओबीसीची ही समस्या आहे.
    अर्थात आपल्या आयुष्यातील वर्षातील अनेक दिवस,अनेक वर्षातील अनेक महिने उत्सवात निघून जातील.असा आपला उत्सवप्रिय समाज वेळ,पैसा खर्चुन अधोगतीला येईल.तसा आलेलाच आहे.
   विसर्जन आहे,लग्न आहे,बारसे आहे,सण आहे,खा प्या आनंद साजरा करा.संत तुकोबाराया म्हणतात 
" बुडते हे जन,न देखवे डोळा, म्हणूनी कडवडा येत असे."
याच साठी आपल्या बहुजन महामाणवांनी, माणव समाजाच्या कल्याणासाठी उभे आयुष्य संपविले.उत्सव करायचेच तर ,त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून ,त्यांच्या विचारांचा मार्ग आपण धरणार आहोत का? की महात्मा फुलेंनी आमच्यासाठी काही केले नाही म्हणून त्यांच्याप्रती कृतघ्न होणार आहोत.या महानायकांचा स्वीकार न करणे,त्यांना समजून न घेणे आणि अनावश्यक उत्सवात आपली शक्ती खर्ची घालणे यातच आपली अधोगती आहे.
   तुर्त एवढेच.कधी विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न असेल.

      अशोक मांदाडे, गडचिरोली

Monday, September 15, 2025

छत्रपती शिवराय आणि कलिवर्ज्य

दि.15/04/2025
🌷छत्रपती शिवराय आणि कलिवर्ज्य 🌷

          एक खोटी व निराधार कल्पना तुमच्या आमच्या सर्वांगीण विकासात कशी अडसर ठरू शकते याचे एक मोठे उदाहरण देता येईल.
          पुराण कथांप्रमाणे चार युग सांगितले जातात त्रेता युग ,द्वापार युग,सतीयुग आणि सध्या चालू असलेला कलियुग.आता या कलियुगात वर्ज्य केलेल्या बाबी,त्याचे नियम म्हणजे कलिवर्ज्य होय.म्हणजे हे कलियुग लागल्यावर काय काय करू नये ते सांगितले आहे.ते ते वर्ज्य आहे.यातील एक म्हणजे समुद्र पर्यटन निषिद्ध माणले आहे.कलियुगात समुद्र पर्यटन करता येणार नाही.
     याउलट मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी मोहीमा राबविल्या.सागरी व्यापार केला.सागरी मार्गाचे धोखे लक्षात घेऊन आरमाराची उभारणी केली, जलदुर्ग उभारले.म्हणजे लावून दिलेल्या थोतांड नियमांना शिवरायांनी झुगारून दिले.कलिवर्ज्य म्हणून घातलेली बंधने राजांनी माणले नाही.यामुळे त्यांचे काहीही वाकडे झाले नाही.
याचेच अनुकरण मात्र बाळ गंगाधर टिळक यांना करता आले नाही.ते परदेशात तर गेलेच.परंतू परदेशात जाण्याकरीता समुद्र पर्यटन केले,जे की निषिद्ध आहे, वर्ज्य आहे म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घेतले.असा हा धर्म आंधळेपणा.
        दोनशे वर्षांपूर्वी जे शिवरायांनी केले,त्या शिवरायांचा आदर्श टिळकांना घेता आला नाही.

          
संदर्भ -देवादिकांचे रहस्य.


                 संकलन व मांडणी 
          अशोक मांदाडे,गडचिरोली .

Saturday, September 13, 2025

दारातली चिमणी

माझ्या डाव्या पायाचा ऑपरेशन झाला.माझ्याशी संपर्क संबंध असलेली अनेक आप्त मित्र मंडळी रोज भेटायला येतात.
 हे पाखरूही जनू मला पहायला आले.माझ्याजवळ येऊन जसे काही विचारत आहे. "आता बरे आहात काय ? "
   पाच सहा वर्षांपूर्वी अशाप्रकारच्या पाखराने आमच्या जिन्याखाली एक घरटं तयार करून अंडी घातली .त्यांची पिल्ले होऊन उडण्यालायक झालीत.तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची आमच्या घरच्या मंडळींनी काळजी घेतली.
  पिल्ले मोठी झालीत उडू लागली.त्यातच एक दिवस मला जिण्यात जाण्याचा जाण्याचा काम आला,मी तेथे गेलो नी पहातो तर काय ! काड्याकुड्यासह केसंही जमा करून तयार केलेला खोप्यातील केसं,एका पिलल्लाच्या जीवाजे काळ ठरले. बाकीची पिल्ले उडाली,पण एका पिल्लाच्या दोन्ही पायात ते केसं गुंतली होती.पिल्लु बिचारे उलटे पाय करून खाली लोंबकळत होते.
   असले दृष्य पाहताच मी त्याला काढून बघतो तर,त्याच्या पायाला असलेला केसांचा गुंथा सुटला सुटेना.शेवटी कैची बोलावून ते केसं कापूस त्या पिल्लाची सुटका करावी लागली. तेव्हापासून अगदी आजपर्यंत आमच्या जिण्यात,ते झाड आता नाही आहे पण; घरासमोरील बाभळीच्या झाडावर,दरवाजावर लावलेल्या टिनाच्या शेडमधील कप्यात अशी अनेक प्रकारच्या पक्षांची खोपी आमच्या घरी तयार करतात . त्या पक्षांचा ऐत पूर्ण यशस्वी होतो.आनंद वाटते की, असले काळ्या रंगाचे पक्षी,जंगली कबूतर (कवडी),लांब शेपटीचे सफेद पक्षी,बारीक चिमणी,रोजची गावात वावरणारी चिमणी,डोक्यावर तुरा आणि शेपटीखाली लाल रंग असणारे पक्षी यांसारखे,घरात असे विविध प्रकारचे पक्षी रोज आमच्या घराच्या परिसरात फिरतात,चरतात,पाणी पितात.
    आठवण झाली.असे वाटायला लागले की,तेच पिल्लु तर नाही ना! मला भेटायला आले.