Saturday, September 13, 2025

दारातली चिमणी

माझ्या डाव्या पायाचा ऑपरेशन झाला.माझ्याशी संपर्क संबंध असलेली अनेक आप्त मित्र मंडळी रोज भेटायला येतात.
 हे पाखरूही जनू मला पहायला आले.माझ्याजवळ येऊन जसे काही विचारत आहे. "आता बरे आहात काय ? "
   पाच सहा वर्षांपूर्वी अशाप्रकारच्या पाखराने आमच्या जिन्याखाली एक घरटं तयार करून अंडी घातली .त्यांची पिल्ले होऊन उडण्यालायक झालीत.तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची आमच्या घरच्या मंडळींनी काळजी घेतली.
  पिल्ले मोठी झालीत उडू लागली.त्यातच एक दिवस मला जिण्यात जाण्याचा जाण्याचा काम आला,मी तेथे गेलो नी पहातो तर काय ! काड्याकुड्यासह केसंही जमा करून तयार केलेला खोप्यातील केसं,एका पिलल्लाच्या जीवाजे काळ ठरले. बाकीची पिल्ले उडाली,पण एका पिल्लाच्या दोन्ही पायात ते केसं गुंतली होती.पिल्लु बिचारे उलटे पाय करून खाली लोंबकळत होते.
   असले दृष्य पाहताच मी त्याला काढून बघतो तर,त्याच्या पायाला असलेला केसांचा गुंथा सुटला सुटेना.शेवटी कैची बोलावून ते केसं कापूस त्या पिल्लाची सुटका करावी लागली. तेव्हापासून अगदी आजपर्यंत आमच्या जिण्यात,ते झाड आता नाही आहे पण; घरासमोरील बाभळीच्या झाडावर,दरवाजावर लावलेल्या टिनाच्या शेडमधील कप्यात अशी अनेक प्रकारच्या पक्षांची खोपी आमच्या घरी तयार करतात . त्या पक्षांचा ऐत पूर्ण यशस्वी होतो.आनंद वाटते की, असले काळ्या रंगाचे पक्षी,जंगली कबूतर (कवडी),लांब शेपटीचे सफेद पक्षी,बारीक चिमणी,रोजची गावात वावरणारी चिमणी,डोक्यावर तुरा आणि शेपटीखाली लाल रंग असणारे पक्षी यांसारखे,घरात असे विविध प्रकारचे पक्षी रोज आमच्या घराच्या परिसरात फिरतात,चरतात,पाणी पितात.
    आठवण झाली.असे वाटायला लागले की,तेच पिल्लु तर नाही ना! मला भेटायला आले.

No comments:

Post a Comment